मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर’ प्रदर्शित होण्यापूर्वी केला, दिवंगत आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘धर्मवीर’ मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आज रसिकांच्या भेटीला आला आहे . याआधी काही वेळात ठाण्यातील व्हीव्हीयाना मॉलमध्ये या चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो आयोजित करण्यात आला. या खास शोसाठी नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

पहिल्या शोआधी दिवंगत आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला.. पहिल्या शोसाठी चित्रपटातील कलाकारांनीही हजेरी लावली होती.

 

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आनंद दिघे हे लोकप्रियतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे मानले जात होते. 2000 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वृत्तानुसार, आनंद दिघे यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना इतका धक्का बसला की त्यांनी त्यांना ज्या रुग्णालयात दाखल केले होते ते जाळून टाकले होते

सध्या धर्मवीर या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारली आहे. मंगेश देसाई निर्मित हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *