इलॉन मस्क यांनी ट्विटरची डील स्थगित केली , जाणून घ्या काय आहे कारण

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरच्या खरेदीची घोषणा केली. परंतु १३ मे रोजी इलॉन मस्क यांनी सांगितले की, हा करार काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. 

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी १३ मे रोजी सांगितले की ट्विटरवरील सुमारे 5% वापरकर्ते स्पॅम किवा बनावट खाती आहेत. त्यांची गणना होईपर्यंत हा करार तात्पुरता थांबवण्यात आला आहे.

इलॉन मस्क यांनी २५ एप्रिल रोजी ट्विटरसोबत करार केला. या करारानुसार इलॉन मस्क ट्विटर ४४ अब्ज डॉलरला विकत घेत होते. मस्क यानी ट्विट केले, “ट्विटर डील सध्या तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. स्पॅम आणि बनावट खात्यांचा वाटा 5% पेक्षा कमी आहे की नाही हे अद्याप निर्धारित करणे बाकी आहे.

हेही वाचा :- मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर’ प्रदर्शित होण्यापूर्वी केला, दिवंगत आनंद दिघे यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक

इलॉन मस्कने ट्विटर करार होल्डवर ठेवला आहे. तथापि, हा करार कायमचा होल्डवर ठेवला नाही, तर त्यांनी तो तात्पुरता होल्डवर ठेवला आहे. मस्क यांनी ट्विटर डीलल मस्क यांनी ट्विटर डीलला धरून ठेवण्याचे कारण म्हणून स्पॅमचा उल्लेख केला आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, मस्कने ट्विटरला $44 अब्जमध्ये खरेदी करण्याचा करार केला होता

हेही वाचा :- शेतीला अनुसरून व्यवसायाला उत्तम पर्याय म्हणजे बटेर पालन – संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *