विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर, भाजपचे आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी पाच उमेदवार विजयी

आज विधानपरिषदेची निवडणूक पार पडली आणि निवडणुकीसाठीच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाले आहेत.

यात भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचा विजय झाला असून महाविकास आघाडीच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, सचिन अहिर आमाशया पाडवी, भाई जगताप यांचा विजय झाला आहे.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण नऊ उमेदवारांचा विजय झाला आहे. पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी २५.७३ चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.

मत मोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे चार, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी निवडून आले आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार अद्यापही जाहीर झाले नाही. काँग्रेसच्या हंडोरे यांना २२ मतं, भाई जगताप यांना १९ मते मिळाली आहेत तर भाजपच्या प्रसाद लाड यांना १७ मतं मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *