एकनाथ शिंदे तब्बल २५ आमदारांसोबत नॉट रिचेबल? गुजरातमध्ये असल्याची माहिती

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला पोहचले आहेत . एकनाथ शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात देखील आहेत . विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला.

विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर, भाजपचे आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी पाच उमेदवार विजयी

त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे २५ शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली . त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि काही आमदार मंत्री नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची समोर आली होती . त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नारकर्ता येणार नाही.

बि गोळा (सिड बाॅल) एकदा वाचाच

मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे याच्या सोबत नॉट रिचेबल आमदार :

-साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
-सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
-उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
-पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
-बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
-मेहकरचे आमदार संजय गायकवाड
-बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांचा मोबाईल बंद आहे
-सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
-पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
-औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
-कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
-वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
-महाडचे भरत गोगावले

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर आता शिवसेनेतच फुट पडतेय की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतले प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे यांचा नाराज गट काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीलाच धक्का मिळण्याची शक्यता आहे. पत्रकारांनी काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याचं लक्षात आलं. वर्षा बंगल्यावर याची कुणकुण लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश दिले गेले. पण काही आमदार नॉट रिचेबल असल्याचं लक्षात आलं. शिवसेनेतील धुसफूस समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *