गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज ठाकरे सह इतर प्रमुख नेत्यांची बैठक बोलावणार

आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस महासंचालक यांची बैठक संपन्न झाली. राज ठाकरेंना बैठकीसाठी बोलावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासचा प्रयत्न सुरू आहे या सर्व गोष्टींना शासन अतिशय गांभीर्याने घेत आहे. माझी सर्वांना विनंती आहे कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, समाजामध्ये तेढ अशी कृती करू नका अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा (Read This) भविष्याच्या दृष्टीने गटशेती महत्वाची…!

2005 मध्ये कोर्टाच्या आदेशा नंतर राज्य सरकारने 2015 झाली काही जीआर काढले आहेत. तसेच 2017 मध्ये देखील काही जीआर आहेत त्यानुसार लाऊड स्पीकरची पद्धत ठरवून दिली आहे. याबाबतीत अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांची बैठक बोलावणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली

हे ही वाचा (Read This)

भांडण सोडवने पडले महागात, पोलीस शिपाई आणि त्यांच्या मित्रावर झाला जीव घेणा हल्ला

1 मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद शहरात सभा होणार आहे, याला काही संघटनांनी पक्षांनी विरोध दर्शविला याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक पोलिस प्रशासन यावर निर्णय घेईल असे सांगितले, तसेच मनसैनिक या सभेची जय्यत तयारी करताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *