सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेवर ईडीची कारवाई ? जळगाव दौऱ्यातील भाषणात मुंडेंचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, वरिष्ठ नेते याच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई सुरु आहे, ईडी तसेच सीबीआयकडून सुरु असलेल्या कारवाईमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या अटकेत आहेत.

ईडीचा ससेमीरा असणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील आहेत. त्यांनी जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केलं. या कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी आपल्यामागेदेखील ईडीचा ससेमिरा असल्याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली .

हेही वाचा :- IAS पूजा सिंघल यांच्यावर ईडीची कारवाई ; कोटीचे घबाड जप्त

“अनेकांचे जसे खटले सुरु आहेत तसे माझेही सुरु असून , एकनाथ खडसेंनी माझी ईडी सुरु असल्याचं म्हटलं. नाथाभाऊंसारखा माझाही ईडीचं सुरु आहे. पण कोणाला माहिती नाही”, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.काहीजण ते खरं म्हणाल्याचा दावा करत आहेत. तर काहींकडून मुंडे आपल्या भाषणात मिश्किलपणे बोलून गेले, अशी चर्चा सध्या सुरु आहे. धनंजय मुंडे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते.

या दरम्यान पारोळा तालुक्यातील इंदवे येथे कार्यक्रमात बोलताना मुंडेंनी ईडीबाबत गौप्यस्फोट केला. पण ईडीची किंमत बीडी तितकी सुद्धा राहिली नाही, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

हे सुद्दा वाचा :- सासरच्या मंडळींकडून पैश्यासाठी महिला डॉक्टरचा छळ

धनंजय मुंडे यांनी यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “ओबीसी आरक्षणाबाबत कुठलाही निर्णय न घेता उलट महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे”, अशी जोरदार टीका धनंजय मुंडे यांनी जळगावात केली.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना आरक्षण देण्यावरून हे सरकार उघडे पडले असल्याची टीका केली होती. फडणवीसांच्या या टीकेला मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा (Read This) सरकारी नोकरी: महाराष्ट्र विद्युत विभागात भरती, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *