धक्कादायक ; पत्नीसमोर पतीला फरपटत नेत गळा चिरला

औरंगाबाद – शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले आणि धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

हेही वाचा :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेवर ईडीची कारवाई ? जळगाव दौऱ्यातील भाषणात मुंडेंचा गौप्यस्फोट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. कैलास बीआनसिंग मिंगवाल असे हत्या झालेल्या मजुरांचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला. हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले अशी माहिती पोलिसांनी दिली.

कैलास हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील असून काही महिन्यांपूर्वी तो रोजगारासाठी पत्नी मुलांसह औरंगाबादेतील करोडी शिवारात आला होता. तेथे तो क्रमांक-१११ मध्ये शेतात कामाला होता. शेताजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तो पत्नीसह राहत होता मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने झोपले अवस्थेतच कैलास ला फरपटत बाहेर नेले. त्यानंतर धारदार हत्याऱ्याने पत्नीसमोरच कैलासच्या गळ्यावर तीन ते चार वार करून हत्या केला. त्यानंतर लगेच अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

घटनेनंतर पत्नीने आरडाओरडा करून इतर लोकांना उठवलं. त्यानंतर वस्तीतील लोक मदतीला धावून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृत कैलासचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *