अनेक नवरदेवांना फसवणारी बोगस नवरी पोलिसांच्या ताब्यात

लग्न करण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलांसाठी महत्त्वाची बातमी. लग्न करण्याच आमीष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा नुकताच बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत बनावट नवरीसह तिची आई आणि मुख्य सूत्रधारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. लग्नाच्या बहाण्यानं तरुणांना लुटणाऱ्यां पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. फसवल्या गेलेल्या एका तरुणानं याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत आधी या टोळीच्या मुख्यसूत्रधाराला अटक केली, त्यानंतर आता याप्रकरणी पोलिसांनी बनावट नवरीसह तिच्या आईला देखील ताब्यात घेतल. हा सगळा धक्कादायक प्रकार लग्न होऊन झाल्यानंतर आठ दिवसांनी नवरदेवाच्या लक्षात आला. कारण आठ दिवसांनंतर नवरी मुलगी घरातून निघून गेली आणि त्यानंतर ती परत आलीच नाही, तेव्हा काहीतरी गौडबंगाल आहे, हे समजताच नवऱ्या मुलानं पोलिसात तक्रार दिली. मग हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.

हेही वाचा : पिकांच्या पोषणामध्ये अन्नद्रव्य पुरतता होण्यासाठी मोलाची भूमिका निभावत असतो तो सुक्ष्म

बीड पोलिसांनी चार दिवसांपूर्वी मुख्यसूत्रधार रामकिशन जग्गनाथ तापडीया याला अटक केली होती. पोलिसांकडून रामकिशनची कसून चौकशी केली जातच. या चौकशीतूनच पोलिसांनी बनावट नवरी असलेल्या तरुणीला आणि तिच्या आईलाही अटक केली. या बनावट नवरीचं नाव रेखा असून तिनं अनेकांना फसवलं असण्याचा संशय पोलिसांना आहे. लग्नाळू पोरांना आमीष दाखवून ही टोळी लुटत होती. गेवराई तालु्क्यातील तळणेवाडीच्या एका नवरदेवाची फसवणूक झाली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. लग्नाच्या आठ दिवसांनंतर नवरी मुलगी गायबच झाली. घरातून निघून गेलेली ही मुलगी पुन्हा न आल्यानं नवरदेवाला संशय आला.

हेही वाचा : तामिळनाडूमध्ये मंदिराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून ११ जणांचा मृत्यू

त्यानंतर पोलिसांनी नवरदेवाच्या फिर्यादीवरुन नवरी मुलीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली. त्यानंतर बनावट नवरीचा शोध घेण्यात बीड पोलिसांना यश आलंय. आता बनावट नवरीसह तिच्या आईचीही कसून चौकशी केली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *