मंत्री एकनाथ शिंदे नेमके कोण? कसे आले राजकारणात? जाणून घ्या जीवन प्रवास

एकनाथ संभाजी शिंदे हे नाव सध्या महाराष्ट्राच्या रजणाकात धुमाकूळ घालतंय, गेल्या ३-४ दिवसां पासून सुरू असलेल्या या शिवसेना आणि शिंदेसेना वादामुळे अक्षरशः महाराष्ट्रतच न्हवे तर गुजरात आणि गुहाटीच्या लहान लहान मुलांना देखील हे नाव माहित झालयं, तब्बल ४१ आमदारांना घेऊन, महाराष्ट्राच्या राजकारणात जणू या नावाने एक इतिहासच रचला आहे, ठाणे, गुजरात होत हे नाव गुवाहाटी आणि आता दिल्लीत देखील चर्चा विषय बनल आहे, चहाच्या टपरी पासून ते बड्या फॅक्ट्री पर्यंत फक्त शिवसेना आणि एकनाथ संभाजी शिंदे हेच नाव गाजतंय, कोण आहे एकनाथ शिंदे? कसे राजकारणात आले? कसे झाले शाखा प्रमुख ते नगरविकास मंत्री? जाणून घेऊयात.

सध्या राजकारण हा शब्द जरी उच्चारला तर सध्या एकनाथ शिंदेंचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, ११ आमदारांना घेऊन सुरत ते आता गुहाटीत ४० हुन अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाला कसा, शिवसेना शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार, ते मंत्री असा हा शिंदेंचा राजकीय प्रवास अगदी तळागाळात काम करून शिंदेने शिवसेनाची संघटना बांधणी असो, बेळगावचे आंदोलन असो कि आंदोलनं नंतर तुरुंगवास असो हे सगळं पाहिलं.

रिक्षा चालक झाला नेता आणि मग नगर विकास मंत्री…

शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ साली साताऱ्या जिल्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दारे येथे झाला हे त्यांचे मूळ गाव, शिक्षणासाठी ते ठाण्यात आले, घरची परिस्थिती बेताची होती शिक्षण मध्यावरच सोडून त्यांनी कुटुंबाचा उदार निर्वाह करायचा म्हणून सुरुवातीला ठाण्यातील एका मच्ची कंपनीत सुपरवायझर म्हणून काम केले. त्यानंतर कमी पगारात भगत नसल्याने त्यांनी स्वतःचा रिक्षा घेतला, ठाण्यात रिक्षा चालवत असताना त्यांच्यवर आनंद दिघे आणि शिवसेनेचा प्रभाव झाला आणि त्यांनी शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. अनेक काम केली, आंदोलन केली, तुरुंगवास भोगला आणि त्यांची संघटने साठीची तगमग पाहून आनंद दिघे यांनी शिंदेंना १९९७ च्या महापालिका लढवायची जबाबदारी शिंदेंना दिली आणि ते निवडूनही आले.

२००१ ठाणे महापालिकेचे सभागृह नेते म्हणून देखील ते निवडून आले. पुन्हा २००२ ला ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले, त्या नंतर त्यांच्या केलेल्या कामा मुळे त्यांना ठाणे जिल्यात आमदारकीसाठी उभे केले आणि ते २००४ ला आमदार झाले. २००५ मध्ये शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली. त्या काळी पक्षात इतक्या प्रतिष्ठित पदावर नियुक्त झालेले शिंदे पहिले आमदार ठरले. २००९ तसेच २०१४ ला त्यांनी शिवसेनेचा गड पुन्हा राखला, ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 या काळात विरोधी पक्ष नेता म्हणून देखील शिंदेनी काम केले.

हेही वाचा: 

शिंदेनी भोगलेली महत्वाची मंत्री पद

२०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये PWD (PU) चे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कारभार पहिला, याच काळात त्यांना ठाणे जिल्याचे पालक मंत्री पद सुद्धा त्यांना देण्यात आल, २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महा-विकास-आघाडी अंतर्गत कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तसेच त्यांना नागरी विकास हे मंत्रिपद देखील देण्यात आल. २८ नोव्हेंबर २०१९ ते ३० डिसेंबर २०१९ या काळात त्यांनी गृहमंत्री पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळला. २०२० मध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

तब्बल १९९७ ते आजवर म्हणजे २५ वर्ष शिवसेनेशी एकमत आणि निष्ठा राखून काम करणार नेतृव का वेगळं झालं? याचा उत्तर आपल्यला सध्याच्या त्यांच्या अनेक प्रतिकर्यां मध्ये पाहायला मिळतंय, जस राज ठाकरेंनी शिवसेनेला सोडताना बाळासाहेबांना भेटू दिल जात नाही हा आरोप लावला आहे तसाच काही एकनाथ शिंदे आणि यांचे समर्थक सध्या म्हणू लागले आहे. पुढे आता महाराष्ट्राचं काय? कोण असेल महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? असा प्रश्न आता ऐरणीवर आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *