“तुम्हाला तीन तासात संपवून टाकू”, अंबानी परिवाराला धमकीचा आला फोने

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आठ वेळेस धमकी दिली असल्याचे समोर आले. अँटिलिया प्रकरणानंतर दुसऱ्यांदा धमकी आल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केली. या फोन कॉलमुळे खळबळ उडाली आहे.

रोग प्रतिरोधक टोमॅटो ‘अर्का रक्षक’ 75 ते 80 टन प्रति हेक्टरी 90 ते 100 ग्रॅम वजनाची फळे, टोमॅटो 110 दिवसांत तयार

मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली. रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

आठ वेळेस धमकी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे आठही फोन कॉल्स आजच आले. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात असून अधिक माहिती घेतली जात आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण, सांगितल्या ‘या’ मोठ्या गोष्टी

रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी ‘एबीपी’ सोबत बोलताना सांगितले की, आम्हाला आठ फोन कॉल आले होते. आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असून फोन करणारे दहशतवादी असू शकतात असे त्यांनी म्हटले. फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. रिलायन्सच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अँटिलिया’जवळ आढळली होती स्फोटकं असलेली कार

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. एका कारमध्ये जिलेटिनचा साठा सापडला होता. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी देण्यात आली होती. मात्र, या धमकी प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने दहशतवादविरोधी पथकाने अटक केली.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. अँटिलियाजवळ ज्या कारमध्ये स्फोटकं आढळली, ती कार ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची होती. स्फोटकं आढळल्याच्या घटनेनंतर त्यांचा मृतदेह आढळला. हिरेन यांच्या हत्येचा आरोप वाझे यांच्यावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *