ट्रकचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात – तीन जण ठार
पुण्यातील नवले पुलावर आज सकाळी भीषण अपघात झाला. डिझेल संपलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.
मुंबई बंगळूर महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला, सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात तीन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. डिझेल संपल्याने हा ट्रक रस्त्यावर उभा होता त्यांनतर डिझेल टाकून ट्रक सुरू करत असताना हा ट्रक ६० ते ७० च्या स्पीडणे मागे गेला त्यामुले ही दुर्घटना घडल्याचे समोर आलव आहे.
ट्रक मागे जात असताना परंतु ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि हा कंटेनर सत्तरच्या वेगाने मागे गेला. मागे जाताना या ट्रकने दोन-तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये काही दुचाकींचा देखील समावेश आहे. या ट्रक खाली चिरडला गेल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत.