२ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला पुन्हा पुढची तारीख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा परीक्षा घेण्यात येणार होती मात्र आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
१७ डिसेंबर रोजी शासनाकडून घेण्यात आलक्या निर्णयाच्या अमलबाजवणीसाठी आयोगाने २ जानेवारी २०२२ रोजी होणारी परीक्षा रद्द केली आहे. असे आज प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ ऑक्टोंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा- २०२१ आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. २ जानेवारी, २०२२ रोजी पूर्व परीक्षा होणार होती तर मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी होणार होती.
या परीक्षेची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *