IPL | आयपीएलला टाटांची साथ दोन नवीन संघांचीही बात

आयपीएलच्या नवीन हंगामात आता टाटा चा लोगो आता दिमाखात झळकणार असून विवो या चिनी कंपनीला बाजूला करत आयपीएल ने टाटा सोबत आपले नाते जोडण्याचे नक्की केले आहे. बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. विवो ही कंपनी या आधी आयपीएल टायटल स्पॉन्सर होती. ही संधी आता टाटा या कंपनीला मिळाली आहे. आता आता ‘ टाटा आयपीएल’ असं म्हणाताना क्रिकेट शौकीन आता अधिक खुश होतील. कारण टाटा हा पूर्णतः विश्वासार्ह असा भारतीय ब्रँड आहे.

यावेळी आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद असे दोन नवीन संघ सर्वांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यांमध्येही वाढ होणार आहे. ई या आयपीएलचा मेगा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगण्यात येत असून यंदा दोन नवीन संघ आणि टाटांचा टॅग यामुळे आयपीएलची रंगत आणखी वाढेल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *