गुरुशिष्याच्या नात्याला काळिमा। शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींची आत्महत्या

कोल्हापूर : कागल तालुक्यातील अर्जुनवाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच गावातील एका शिक्षकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता.

हा शिक्षक गेल्या महिना दीड महिना पासून तिला त्रास देत होता. यामुळे त्याच्या या त्रासाला कंटाळून सदरच्या तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.आकांक्षा तानाजी सातवेकर वय १९ असे मृत तरुणीचे नाव आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला आज अटक केली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, अर्जुनवाडा येथील रहिवाशी पण मुगळी (ता. कागल) येथील एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारा अमित कुंभार हा आपल्या गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आकांक्षाला सतत फोन करत असे. फोन, तर कधी सोशल मीडिया च्या माध्यमातून सतत त्रास देत होता. गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे मेसेजेसही पाठवायचा. तु लग्नासाठी होकार दिलास तर, मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन. असे अनेक संदेश तो पाठवत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *