धक्कादायक । एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या

सोलापूर : कोंडी येथे एसटी चालकाच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस अली आहे. हि घटना बुधवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमास घडली. अमर तुकाराम माली ( २०, रा कोंडी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पैसे नसल्याने त्याने आत्महत्या केली असे सांगण्यात येत आहे.

अमरने वडिलांना बुधवारी सकाळी पैसे मागितले, त्यावेळा त्याच्या वडिलांनी माझे काम दोन तीन महिन्यां पासून बंद आहे. तुला पैसे कुठून देऊ असे त्याचे वडील त्याला म्हणाले. त्या नंतर आंदोलन सुरु झाल्याच्या ठिकाणी ते निघून गेले. अमर देखील बाहेर गेले. दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान तो घरी आला. घरत त्याची आई आणि काकू जीवन करत होते. त्याला आईने जेवणाचा आग्रह केला. मात्र मी अराम करतो. असा अमर म्हणाल आणि त्याच्या खोलीत गेला. खुप वेळ झाला अमर बाहेर नाही आला म्हणून त्याच्या आईने त्याला आवाज दिला. आतून काहीउत्तर न मिळाल्याने त्यांनी खडकीतून पहिले. तेव्हा त्याच्या आईच्या साडीने गळफास घेतलेले दिसले.

दरम्यान, त्याच्या मोठ्या भावाने दार तुडवून त्याला खाली उतरवले आणि शासकीय दवाखाण्यात त्याला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला तपासून मृत घोषित केले. अमर हा १२ विज्ञान शंकेचं विध्यर्थी होता. तो सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयात शिकत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *