राज्याच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र यायला हवं – मंत्री रामदास आठवले

राज्याच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपमधील वाद संपून त्यांनी एकत्र यायला हवं , अशी आमची इच्छा असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. मंत्री रामदास आठवले हे दोन दिवसीय औरंगाबादच्या दौऱ्यावर असून सुभेदारी विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर बोलले . भाजप आणि शिवेसेनतील भांडण मिटावे, अशी आमची इच्छा असून यासाठी शिवसेनेने किंबहुना उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी मांडले.

औरंगाबादमधील सुभेदारी विश्रामगृहावर मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे परस्परांवर जे आरोप प्रत्यारोप चालले आहेत, त्यावर पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता . यावेळी रामदास आठवले म्हणाले, हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण आहे. पण कोण कुत्रा आणि कोण मांजर हे पहायला पाहिजे. हे भांडण मात्र आहे. हे मिटलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यात पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना त्यांनी समज द्यावी. अपशब्द वापरण्यापेक्षा किंवा शिवराळ भाषा वापरण्यापेक्षा महाराष्ट्राची मराठी संस्कृती जपली पाहिजे. त्यामुळे हे भांडण आहे, ते होता कामा नये.

महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेऊन भाजपसोबतचे भांडण मिटवावे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. तसेच दोन्ही काँग्रेसमुळे शिवसेनेचे पुढील निवडणुकीत मोठं नुकसान होणार आहे. आम्हाला काही सत्तेची आवश्यकता नाही. आता अडीच वर्ष होत आलेली आहेत. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना विचार करत असेल आणि बीजेपीही त्या फॉर्म्युल्यावर तयार होऊ शकेल.
पण सध्या तरी शिवसेनेचं तसं काही चित्र दिसत नाहीये. या दोघांनी भविष्यासाठी एकत्र यावं, असं आमची इच्छा आहे. वाद मिटावा, अशी इच्छा चंद्रकांत दादा पाटील यांनीही व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे आरोप-प्रत्यारोप थांबवावे, असं माझं मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *