रवी राणा यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान, …तर ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसा म्हणू
अमरावती : सध्या महाराष्ट्रात ‘भोंगा’ वाद जोर धरत आहे, याच भोग्य प्रकरणी दुसऱ्या बाजूने आमदार रवी राणा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात ते म्हणतात, “हनुमान जयंतीच्या पर्वावर उद्या सकाळी मी आणि खासदार नवनीत राणा हनुमानाच्या मंदिरात हनुमान चालीसा वाचणार आहोत. हनुमानाच्या मंदिरात भोंगा लावणार असून. हनुमान चालीसा वाचन करत असताना भोंगा नसलेल्या मंदिरांसाठी भोंग्यांचे वाटपदेखील करणार. राममंदिरात सुंदरकांड झालं पाहिजे. यासाठी राम मंदिरातसुद्धा आम्ही भोंग्यांचं वाटप करणार आहे”, असा आमदार रवी राणा यांनी ठणकावून सांगितलं.
हेही वाचा :- नवीन प्रभाग रचना तयार करा ; नगरविकास खात्याकडून मनपाला आदेश
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालीसा वाचला पाहिजे. उद्धव ठाकरे जर हनुमान चालीसा वाचत नसतील, तर त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. तो विसर जागृत करण्यासाठी हनुमान जयंतीनंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू.” असा आव्हान रवी राणेंनी उद्धव ठाकरेंना केल.
हेही वाचा :- किरीट सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांवर मोठा आरोप, ‘तो’ हवालाकिंग कुठे आहे ? केला असा सवाल
दरम्यान, मी पहिल्यांदा हनुमान चालीसा वाचणार नाही. अनेक वेळा हनुमान चालीसा वाचलेलं आहे. आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम करत आहोत. दरवर्षी रवीनगरमध्ये हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होत असल्याचंही खासदार नवनीत राणा यांनी देखील सांगितलं.
रवी राणा काय म्हणाले ?
https://fb.watch/cp6pxjVyMX/