किरीट सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांवर मोठा आरोप, ‘तो’ हवालाकिंग कुठे आहे ? केला असा सवाल

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशार दिला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले आहे? असा सवाल केला , चतुर्वेदीची माहिती याची माहिती जनतेला द्यावी असे आव्हान देखील उद्धव ठाकरे यांना सोमय्यांनी केले, तसेच नंदकिशोर चतुर्वैदी यांच्या कंपन्यांची यादी समोर आल्याचे सांगत त्यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांना फरार घोषित करावे, असे देखील सोमय्या म्हणाले . मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय हे नंदकिशोर यांचा वापर करत आहेत का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी यांचे ठाकरेंसोबत आर्थिक व्यवहार असून आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याबरोबर नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक व्यवहार असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून. नंदकिशोर चतुर्वैदी यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत? असा सवालदेखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्या मालकीच्या तीन कंपन्या आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

हेही वाचा :- वकील गुणरत्न सदावर्तेच्या पोलीस कोठडीत पुन्हा ४ दिवसांची वाढ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम कंपनी असून, या कंपनीशी ठाकरे यांचा काय संबंध आहे हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. श्रीजी होम कंपनीत २९ कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा झाल्याचेही यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले.

हे ही वाचा (Read This) PM Kisan Scheme: आता आधारशिवाय पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही, नियम झाले कडक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *