रामदास कदमांचा शिवसेना नेतेपदाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’

शिवसेनेला खिंडार पडण्याची मालिका सुरूच असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला आहे..

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या युद्धाने गाठला एक मैलाचा दगड, रचला इतिहास 18 महिन्यांत 200 कोटी लसीचे लक्ष्य पूर्ण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आली. मातोश्रीवर बोलवून सांगितलं की, मीडियासमोर जायचं नाही. एवढेच नाही तर मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला,” असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

चार लग्ने झाली, एक बायकोचा मृत्यू, तीन बायकांना त्रासलेल्या नवऱ्याने केली आत्महत्या

रामदास कदम हे २००५ ते २००९ पर्यंत विरोधी पक्षनेते होते. २००५ मध्ये त्यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली. २०१० मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले. २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेनेचा कोकणातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *