नर्मदा नदीत कोसळली बस, १३ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.

राष्ट्रपती पदासाठी आज मतदान, निकालही आजच

महाराष्ट्र सरकारची बस होती, सकाळी 7च्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे जात होती, इंदूरमध्ये 12 प्रवासी चढले.. नर्मदा नदीवरील ब्रिजवरुन खाली कोसळली. आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते, अशी माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या युद्धाने गाठला एक मैलाचा दगड, रचला इतिहास 18 महिन्यांत 200 कोटी लसीचे लक्ष्य पूर्ण

दरम्यान, एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री चौहान हे इंदूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *