राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर

 

एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून आता महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर उद्या शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने उद्या सकाळी ११ वाजल्यापासून संप सुरू करणार आहेत.

नीट पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. जोपर्यंत याबाबत तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील असा इशारा मार्डच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सेंट्रल मार्डन लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *