‘पुष्पराज’ ला महिलांकडून चोप, व्हिडिओ कॉल करून देत होता त्रास

बदलापूर : ठाणे शहरात एका दुकानदाराला महिलांनी दुकानात घुसून चोप दिल्याची घटना समोर अली आहे. हा दुकानदार त्याच्या दुकानात आलेल्या महिलांकडून मोबाईल नंबर घ्यायचा. त्यानंतर त्यांना व्हिडीओ कॉल करायचा अशी तक्रार महिला करता आहे. दुकानदाराच्या या कृत्यांमुळे संतापलेल्या महिलांनी थेट दुकानात गाठले. त्यानंतर दुकानदाराला चांगलाच चोप दिला. पुष्पराज परिहार असे महिलांचा चोप मिळालेल्या दुकानदाराचं नाव आहे. पोलिसांनी पुष्पराज याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, ठाणे जिल्यातील बदलापूर पश्चिम भागातील आशीर्वाद हॉस्पिटल समोर अनामिका नोवेल्टी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या दुकानात आलेल्या महिलांकडून दुकानदार पुष्पराज परिहार हा त्यांचे नंबर काहीतरी निमित्ताने घ्यायचा आणि नंबर सेव्ह करून ठेवायचा. त्या नंतर त्यावर तो व्हिडिओ कॉल करत. तसेच महिलांना त्रास देत. या मुळे संतापलेल्या महिलांनी सरळ त्याचे दुकान गाठले आणि त्याला बेदम चोप दिला. तसेच त्याचा व्हिडिओ देखील बनवला. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हयरल होत आहे. तसेच चोप दिल्यानंतर महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *