राज्यात राजकीय गोंधळ, मुंबईत कलम १४४ लागू

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गदारोळात मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलैपर्यंत त्याची संपूर्ण शहरात अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासोबतच सोशल मीडियावरही या वेळी लक्ष ठेवण्यात येणार आहे. शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे याच्या बंडानंतर शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे.

दोन दिवसापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक द्वारे संवाद साधला होता त्यात त्यांनी सर्व बंडखोर आमदारांना पुन्हा यावं असे आव्हान केलं, मात्र एकनाथ शिंदे गटातील आमदार पुन्हा वापस न येत पक्षतील काही आमदार शिंदे गटात सहभागी झाले होते. कालपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्र घेतला असून आज त्याच्यावर कारवाई करण्याची तयारी देखील सुरु आहे. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याचा विचार करून गृह विभागाने मुंबईसह ठाण्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

तानाजी सावंतांचा शिवसेना कार्यकर्त्यांना इशारा, म्हणाले- तुमच्या पदावर राहा

शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवर आता त्यांचे वक्तव्य आले आहे. या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना इशारा देताना ते म्हणाले की, तोडफोड करणाऱ्यांनी पदावर राहावे.

आमची सुरक्षा काढून घेतली – एकनाथ शिंदेंचा उद्धव सरकारवर मोठा आरोप

एकनाथ शिंदे गटाने उद्धव सरकारवर मोठा आरोप केला असून, आमची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने मुख्यमंत्री आणि गृह विभागाला पत्र लिहिले आहे. या पत्रात कुटुंबाला सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेला कोणीही हायजॅक करू शकत नाही : संजय राऊत

शिवसेना कार्यकारिणी बैठकीपूर्वी संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला कोणीही हायजॅक करू शकत नाही. ते म्हणाले की, सध्याच्या संकटाला आम्ही संकट मानत नाही, पक्ष विस्ताराची ही मोठी संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *