खिचडी खाल्ल्यामुळे गमावला एकाने जीव

नांदेड : खिचडी खाल्ल्याच्या शुल्लक कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना नांदेडमधून समोर येत आहे. नांदेड शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील विणकर कॉलनीमध्ये हि घटना घडली. कारण खिचडी खाण्यावरून एका तरुणाचा पिता पुत्रांनीच निर्घृण खून केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी बाप लेकाला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, नांदेड तालुक्यातील धनेगाव जवळ असलेल्या शासकीय दूध डेअरी चौकातील विणकर कॉलनी भागात राहणाऱ्या योगेश विलास गिरी (वय २६) हा व शिवलिंग व्यंकटराव गायंकी (वय ४५) हे दोघेजण देगाव (येळेगाव कारखाना ता. अर्धापूर) येथे कामासाठी गेले होते. दरम्यान, आपले काम आटोपून हे दोघेजण भोकरफाटा मार्गे नांदेड येथे घरी पोहचले. यात योगेश गिरी याने येळेगाव कारखान्याहून परतत असताना. भोकरफाटा या ठिकाणाहून खिचडी पार्सल घेतली. परंतु सदर खिचडीचे हे पार्सल ते शिवलिंग गायंकी याच्या घरी विसरले. त्या दरम्यान शिवलिंगच्या घरच्यांनी खिचडी पार्सल उघडले व त्यातील खिचडी खाल्ली. पण थोड्या वेळाने खिचडीचे पार्सल घेण्यासाठी योगेश गिरी हा शिवलिंगच्या घरी आला.

दरम्यान खिचडीचे पार्सल शिवलिंग याने उघडल्याचे व नंतर खाल्ल्याचे त्याला लक्षात आले. त्यावरून शिवलिंग व योगेश यांच्यात मोठा वाद झाला. ज्यात यावेळी शिवलिंग गायंकी आणि त्याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी या दोघांनी घरी आलेल्या योगेश गिरी यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ज्यात योगेश गिरीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मयत योगेश गिरीची आई शोभाबाई विलास गिरी यांच्या फिर्यादीवरून ३० मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवलिंग गायंकी आणि प्रियदर्शन गायंकीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *