नारायण राणे यांची अजित पवार आणि भास्कर जाधव यांच्यावर टीका
केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्य उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांच्यावर टीका केली.
नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नक्कल विधानभवनातील पायऱ्यावर बसून केली होती, काल सभागृहात देखील या मुद्द्यावर चांगलीच चर्चा रंगली होती.
काल भास्कर जाधव यांनी नितेश राणेला निलंबन करण्याची मागणी केली होती.
संतोष परब यांच्यावर हल्ल्या झाला त्याप्रकरणी नितेश राणेंवर आरोप करण्यात आला आहे. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. माझी मर्यादा काय आहे हे मला माहीत आहे. मी बाकी कोणाची पर्वा करत नाही. कायद्याने वागायचं मला कळतं. माझ्या पदाचा मी दुरुपयोग केला नाही. एवढे वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे. मी अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नाही. विधान भवनाच्या पायरीवर बोलण्यावर बंधने नसतात. तो संसदीय शब्द नाही. कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यांचा काय रेफरन्स देता? असा प्रश्न नारायण राणेंनी केला.
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात नितेश राणेंचा काहीही संबंध नाही. त्यांचं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे. निवडणूक संपेपर्यंत त्यांना डांबून ठेवण्याचा डाव आहे. ३०७ कलम या गुन्ह्यात लावलं आहे. मेंदू, हृदय आणि डोक्याला मार लागला तर हे कलम लावलं जातं. कारण या भागांवर लागलं तर मृत्यू होता. मात्र या प्रकरणात फक्त खरचटलं आहे. तरीही ३०७ कलम लावलं आहे, असं ते म्हणाले.
भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांनी अधिवेशनात नितेश राणे यांनी राजीनामा दयावा अशी मागणी केली होती, यावर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना जशास तसे उत्तर देऊ, असे सांगितले तर सुनील प्रभू काळी पीए होता आजही आहे त्यांनी फक्त पीएच काम फक्त लिहायचं असत त्यांनी जास्त बोलू नये.