विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर – चर्चा न करता विधेयक मंजूर देवेन्द्र फडणवीस यांचा आरोप

आजचा दिवस महाराष्ट्रच्या लोकशाहीतील काळा दिवस आहे, सगळ्यात घाबरट आणि पळकूट महाविकास आघाडीचे सरकार आहे , असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता त्यात आज विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले, या वेळी विधेयकावरून सभागृहात बराच वेळ गोंधळ बघायला मिळाला.
विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक ठरवून चुकीच्या पद्धतीने ऑब्जेकॅशन घेवून हे विधेयक मंजूर करण्याच पाप या सरकारने केलं आहे

राज्य सरकारला आपलं शासकीय महामंडळ बनवायच आहे. आतापर्यंत नवीन विद्यापीठ कायदयने कुठल्याही कायद्यात कधीही मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबीत हस्त क्षेप करण्याची तरतूद नव्हती.
२०१६ चा कायदा दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला होता. संयुक्त समितीने कायदा केला. मात्र आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी प्रकुलपती म्हणून घेतलं आहे. आणि दरवेळी विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबीमध्ये हस्त क्षेप करण्याचा अधिकार त्यांना मिळाले आहे.
या विधेयकामुळे राज्यपालांचे अधिकार कमी करून सरकारची सरशी कशी होईल याचा विचार केला आहे.

आज मजूर झालेलं विधेयक नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात असून प्रतिगामी पद्धतीने विद्यापीठावर कब्जा करून घेण्याचा यांचा विचार आहे.
विद्यापीठ टेंडरमध्ये ढवळा ढवळ करतात. या सरकारला विद्यापीठ राजकीय अड्डा आणि सरकारी हाताच बाहुल होणार आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या विधेयकाच्या विराधात आम्ही सर्वच स्तरावर लढाई लढू न्यायालयात जाऊ, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीच्या पहिला आठवड्यात भाजप, भाजप युवा मोर्चा त्याचबरोबर ज्यांचा या विधेयकाला विरोध आहे त्यांना देखील आम्ही सोबत घेऊ. हे विधेयक मागे घेईपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. असा इशारा विरोधी पक्ष नेत्यांनी दिला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *