आमदार पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : कुर्ला विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर (४२) यांनी रविवारी रात्री कुर्ला, नेहरू नगर रजनी कुडाळकर राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :- लग्ना आधीच्या प्रियकरासोबत विहिरीत उडी घेऊन विवाहितेने केली आत्महत्या

पहिल्या पत्नीच्या अपघाती निधनानंतर मंगेश कुडाळकर यांनी रजनी यांच्याशी विवाह केला होता. रजनी यांनी घरगुती वादातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रजनी यांनी आत्महत्या का केली, अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाबल यांनी सांगितले.

हेही वाचा :- या पिकाची लागवड करा ३ वर्षे नो टेन्शन, मिळवा ६ लाखांपर्यंतचे उत्पन्न. 👇🏼👇🏼

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *