राज्यसभा निवडणूकीत एमआयएम करणार महाविकास आघाडीला मतदान

राज्यसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. सहाव्या उमेदवारावरुन जोरदार डावपेच होत आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत, त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो आहे, दुसरीकडे राज्यातील फक्त २ आमदार असला पक्ष म्हणजेच एमआयएम ने महाविकास आघाडीला समर्थन दिले आहे. याची माहिती एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. जलील यांनी ट्विटच्या माध्यमातुन हि माहिती दिली आहे.

हेही वाचा :

“आमच्या पक्षाने भाजपला हरवण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे राजकीय/वैचारिक मतभेद शिवसेने सोबत राहीलच” असे ट्विट जलील यांनी केलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून टीका होताना पाहायला मिळत आहे.

मनसेने शिवसेनेवर यावर टीका केली आहे. निजामाची अवलाद असलेल्या एमआयएमची निवडणुकीत मदत घेऊन, महाविकास आघाडीने जनाची नाही पण मनाचीही सोडली आहे, अशी टीका मनसेने केली आहे. एमआयएमच्या दोन आमदारांनी आज सकाळी मविआला पाठिंबा देत, त्यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यानिमित्नतानं शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे. अशी टीकाही मनसेने केली आहे. राज्याची शोभा करणारी ही निवडणूक असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *