‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्यासोबत लावून दे, अन्यथा जिवे मारीन,.. अल्पवयीन मुलीच्या पित्याची हत्या

केज (जि. बीड) : बीड जिल्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी केज तालुक्यात आपल्या अल्पवयीन मुलीचे फोटो मीडियावर सोशल टाकल्याने जाब रमेश नेहरकर विचारण्यास गेलेल्या वडिलांना ‘तुमच्या मुलीचा विवाह माझ्यासोबत लावून दे, अन्यथा जिवे मारीन, अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ •एप्रिल रोजी दोन साथीदारांच्या मदतीने हल्ला चढविला. यात जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला.

गांजी फाट्यावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकेसाठी संतप्त नातेवाइकांनी मृतदेह तीन तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या दिला.

रमेश एकनाथ नेहरकर (४१, रा. पिसेगाव, ह. मु. बाराभाई गल्ली, केज) असे मयताचे नाव आहे. ते एका खासगी शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून काम करतात. त्यांच्या १७ वर्षीय मुलीचे फोटो भागवत संदीपान चाटे (रा. तांबवा) याने सोशल मीडियावर टाकल्याने ८ एप्रिल रोजी रमेश नेहरकर हे पत्नीसमवेत त्याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी फोटो टाकू नको, अशी समज दिली. त्यावर भागवत चाटे याने तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दे, अन्यथा जिवे मारीन, अशी धमकी दिली. ९ रोजी रमेश नेहकर हे दुचाकीवरून (एमएच ४४ एफ ४८३२) साळेगावला जात होते.

दुपारी साडेतीन वाजता, गांजी फाट्यावर भागवत चाटे याने दोन साथीदारांसमवेत रमेश नेहरकर यांच्यावर हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. केज उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना उपचारासाठी लातूरला हलविले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रमेश नेहरकर यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून आधी भागवत चाटे व इतर दोन अनोळखींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. त्यात आता खुनाचे कलम लावणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *