मनोरंजनमहाराष्ट्र

जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटीची संप्पती ईडीने केली जप्त, कारण ऐकून व्हाल थक्क

Share Now

मुंबई: राजकीय नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ईडीने आता बॉलिवूडलाही दणका दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने जप्त कलेली आहे. तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लाँडरिंगच्या प्रकरणात जॅकलीनची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जॅकलीनचं फिक्स्ड डिपॉझिट जप्त केलं आहे.

हेही वाचा : लग्नात चक्क तलवारीनी राडा, नवरी निघाली अल्पवयीन

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जॅकलिनची 7 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या आधी देखील सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले आहे. दरम्यान, अद्याप जॅकलिन कडून या बाबद काही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

हेही वाचा : पुदिना देतो शरीराला थंडावा, अनेक आजार बरे होतात हे खाल्ल्याने

कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

तिहार तुरुंगात असताना सुकेश चंद्रशेखरने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असल्याचे भासवून पीडितेला फसवणूक कॉल करण्यासाठी कॉन्मनने सॉफ्टवेअरचा वापर केला आणि तिच्या पतीविरुद्ध दाखल केलेल्या कायदेशीर खटल्यांमध्ये मदत करू असे आश्वासन देऊन एका वर्षात कोट्यवधींची उधळपट्टी केली होती. त्या नंतर जेच्क्लीन आणि त्याचे फोटो देखील समोर आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *