देशाला COVID-19 महामारीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी 12 वर्षे लागू शकतात: RBI चा अहवाल

भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अहवालात सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेला कोविड-19 महामारीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी एक दशकापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोविड-19 च्या प्रभावाचे विश्लेषण करणाऱ्या या अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सुमारे ५२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

या अहवालात सांगितले की, कोरोनामुळे झालेल्या नुकसानीला सामोरे जाण्यासाठी भारताला २०३४-३५ वर्ष लागू शकतात. कोरोनाच्या तीन लाटांमध्ये देशाची उत्पादन तूट २०२०-२१ मध्ये 19.1 लाख कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये 17.1 लाख कोटी रुपये आणि २०२२-२३ मध्ये 16.4 लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात इंडियन बार असोसिएशनतर्फे याचिका दाखल

कोरोना महामारीच्या काळात पसरलेल्या अराजकतेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानावर परिणाम झाला आहे. जीडीपीच्या त्रैमासिक आकडेवारीत तिमाही आधारावर प्रचंड चढ-उतार दिसून आले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी एकदा देशाच्या आर्थिक घडामोडींना वेग आला होता, परंतु एप्रिल २०२१-२२ मध्ये, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या गतीचा शेवटदिला.

त्याचप्रमाणे, जानेवारी २०२२ मध्ये, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव दिसून आला आणि त्यामुळे पुनर्प्राप्ती प्रक्रियेला धक्का बसला. अहवालात असेही म्हटले आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही अर्थव्यवस्थांच्या वाढीचा स्तर कमी होण्याचा धोका आहे. या युद्धामुळे वस्तूंच्या वाढत्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीतील समस्या देशांतर्गत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेला त्रास देत आहेत.

RBI च्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील चलन आणि वित्तविषयक अहवालात असेही म्हटले आहे की, चलन आणि वित्तीय धोरणामध्ये नियतकालिक समतोल राखणे हे शाश्वत वाढीच्या दिशेने पहिले पाऊल असले पाहिजे. तथापि, आरबीआयने स्पष्ट केले आहे की हा अहवाल स्वतःचे मत नसून ज्यांनी हा अहवाल तयार केला त्यांच्या मतांचे प्रतिनिधित्व करतो.

आरबीआयच्या संशोधन पथकाने असेही म्हटले आहे की महामारी अद्याप संपलेली नाही. चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही पसरत आहे. तथापि, सर्व देशांच्या अर्थव्यवस्था वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हे ही वाचा (Read This)  पशुसंवर्धन: उन्हाळ्यात प्राण्याला संसर्ग झाला आहे का ? ते असे तपासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *