शिक्षक निघाला नराधम, विध्यार्थिनीला केली शरीर सुखाची मागणी

नागपूर : अत्यंत भयानक असा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. प्राध्यापकाने शाळेय परिक्षेत पास करतो असं अमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केली. ही घटना नागपूर मधील सिंद्धू महाविद्यालयातील असून. संबंधित विद्यार्थींनीने आपल्या मैत्रीणींसोबत थेट पोलिस स्टेशन गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. प्राध्यापकाचं नाव राकेश गेडाम असं आहे. पाचवली पोलिस स्टेशनमध्ये प्राध्यापक राकेश गेडाम यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचबरोबर आणखी अशी काही प्रकरणं आहेत? याचा पोलिस तपास करणार आहे.

हेही वाचा : जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटीची संप्पती ईडीने केली जप्त, कारण ऐकून व्हाल थक्क

महाराष्ट्रात आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहे. विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने तिने थेट पोलिस स्टेशन गाठल्याने हे प्रकरण उघडकीस आले. सध्या मुलांच्या शाळांत परीक्षा आणि महाविद्यालयीन परीक्षा संपल्या आहे. काही दिवसात निकाल जाहीर होईल. नागपूरमध्ये घडलेल्या घटनेत परीक्षेत पास करतो असं अमिष दाखवण्यात आलं आहे असून. त्यामुळे पोलिसांनी यांची गांभीर्याने दखल घेतली.

हेही वाचा : आधार लिंक: जन धन खाते आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करा, तुम्हाला 1.3 लाखांचा लाभ मिळेल!

रत्नागिरी लांजातील शालेय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची तक्रार राज्य महिला आयोगाकडे दाखल करण्यात आली असून. शाळेतील मुलीवर मुख्याध्यापकांनी लैंगिक अत्याचार केले आहे. गवाणे केंद्र शाळा क्रमांक 1 मधील धक्कादायक प्रकार आहे. मुख्याध्यापकाविरोधात लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक अद्याप फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *