औरंगाबाद शहरात आणखी एक खुनाची घटना, मारेकऱ्यांनी गुप्तांग जाळल्याचा प्रकार आला समोर

काही दिवसांपूर्वी शहरातील हसन साजेद पटेल यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे. मात्र आता औरंगाबाद शहरात हादरवून टाकणारा आणखी एक खून झाला आहे. शहरातील टीव्ही सेंटर परिसरामध्ये एका मैदानात ३३ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खून करुन या तरुणाचे गुप्तांग जाळण्याचा प्रकार मारेकऱ्यांनी केला आहे. या घडलेल्या घटनेमुळे औरंगाबाद शहर हादरले आहे.

मारेकऱ्यांने खून करुन गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न केला असून ही घटना शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील मैदानात झाली ३३ वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. दगडाने ठेचून त्याला संपवण्या आलं. तसेच आग लावून त्याचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. तब्बल २४ तासांपूर्वी खून झाला असून आता हा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *