औरंगाबादेत भंगार विक्रेत्यावर ‘जीएसटी’ची धाड २०० कोटींचा सरकारला गंडा

भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारांपेक्षा अधिक बनावट बिल देऊन, जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट सरकारला सुमारे दोनशे कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आता या घोटाळ्यात सहभागी झालेल्या वाळूज, हनुमान नगर येथील एका भंगार दुकानात सायंकाळी धाड टाकण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील भंगार विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इनपुट टॅक्स क्रेडीटचे बनावट बिले तयार करणारे रॅकेट यात समोर आले.

याप्रकरणात मिळालेल्या माहितीप्रमाणे दिल्लीतील समीर मंलिक यांनी शहरात नारेगाव येथील सनराइज् इंटरप्राइजेस नावाने सुरू केले होते. याची बोगस नोंदणी करून ६० कोटींची बोगस बिले फाडली आहे. तसेच १० कोटींची आयटीसी १५ ते १६ शहरातील भंगार विक्रेत्यांना पाठवले होते.

या व्यवहारात संशय आल्याने केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समीर मलिक याला औरंगाबाद मध्ये बोलावले होते. आणि ४ फेब्रुवारीला विमानतळावर त्याला अटक केली. या प्रकरणी विविध भागातील १५ पेक्षा अधिक भंगार विक्रेते सहभागी असल्याचे समोर आल्याने जीएसटी विभागाने धार सत्र सुरू केले आहे.

दि.९ बुधवारी पहिली धाड वाळूजमधील हनुमान नगर येथे टाकण्यात आली. जीएसटी विभागाचे आयुक्त मनोज कुमार रजक, अतिरिक्त आयुक्त एस बी देशमुख ,उपयुक्त चंद्रकांत केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी नारिया प्रविणकुणार पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *