गुगल औरंगाबाला म्हणतंय ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादला ‘धाराशिव’

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला ठाकरे सरकार असताना मान्यता मिळाली होती, मात्र त्यानंतर शिंदे आणि भाजप सरकार आला, त्यांनी हा निर्णय रद्द केला आणि दुसऱ्याच दिवशी बैठक घेऊन पुन्हा या निवार्णायाला मान्यता दिली. त्यावरून अनेक राजकीय टीकास्त्र आपण पहिले आहे. मात्र आता या वादात थेट गुगलने उडी घेतल्याचा पाहायला मिळत आहे. ‘गूगल मॅप’ जे आपण रास्त, ठिकाण शोधण्यासाठी वापरतो त्यावर औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर औरंगाबाद’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव उस्मानाबाद’ असे दाखवत आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, केळी, हळद आणि भाजीपाला पिकांचे मोठं नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

औरंगाबादचे नाव मॅपवर बद्दल म्हणून खासदार जलीलने विचारला गुगलला सवाल

“कृपया गुगल मॅप आपण सांगू शकता की तुम्ही तुमच्या नकाशात माझ्या शहराचे औरंगाबादचे नाव कोणत्या आधारावर बदलले आहे! ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा दुष्प्रचार खेळला गेला आहे, त्यांना तुम्ही स्पष्टीकरण द्यावे” असे जलील म्हणाले

मार्गरेट अल्वा यांचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल, टाकुयात एक नजर त्यांच्या राजकीय प्रवासावर

३४ वर्षां पासून शिवसेनाने कडून ‘संभाजीनगर’ असा उल्लेख

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ साली औरंगाबादच्या सभेत शहराच्या नावाची संभाजीनगर म्हणून पहिल्यांदा उल्लेख केला. तेव्हापासून शिवसेनेकडून शहराचा उल्लेख संभाजीनगर म्हणूनच केला जातो. अनेकदा शिवसेना मंत्राच्या शासकीय कार्यक्रमात सुद्धा संभाजीनगर म्हणूनच उल्लेख केला गेल्याचे सुद्धा समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *