सासरच्या मंडळींकडून पैश्यासाठी महिला डॉक्टरचा छळ
औरंगाबाद :- वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या डॉक्टर महिलेचा सासरच्या मंडळींकडून दवाखान्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नवऱ्यासह सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या एका महिला डॉक्टरचा विवाह डॉ. चेतन प्रल्हादराव शिंदे (रा. रो-हाऊस नंबर ५४, डिलक्स पार्क, सातारा परिसर) याच्यासोबत १८ जानेवारी २०१९ रोजी झाला होता. लग्नात डॉक्टर विवाहितेच्या वडिलांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला सोन्याचे दागिने, वस्तू मोठ्या प्रमाणात दिले. काही दिवस संसार सुखाने सुरु होता.
हेही वाचा :- IAS पूजा सिंघल यांच्यावर ईडीची कारवाई ; कोटीचे घबाड जप्त
मात्र, लग्न झाल्यानंतर महिनाभर नंतर . त्यानंतर माहेरहून पैसे आण, असे बोलून त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरी येऊन १५-१५ दिवस राहणारी नणंद सासू-सासऱ्यासह पतीला विवाहितेच्या विरोधात उचकवून देत होती. यातून पती विवाहितेला शिवीगाळ करण्यासह मारहाण करीत होता.
हेही वाचा :- विवाहित प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून, दीड वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर फरार
२६ जुलै २०१९ रोजी सासरच्या व्यक्तींनी विवाहितेला मारहाण करून घराबाहेर काढले. तेव्हा विवाहितेच्या वडिलांसह नातेवाईकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये विवाहितेच्या नणंदेने तिच्यासोबत भांडण करीत शिवीगाळ केली. विवाहितेच्या पतीने ३० जानेवारी २०२० रोजी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करीत घटस्फोट मागितला आहे. विवाहितेने सातारा पोलिसात धाव घेतली.
सरकारी नौकरी 2022 : 10वी पाससाठी 38000 हजारहून अधिक पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज