विवाहित प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून, दीड वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर फरार

प्रेम प्रकरण म्हंटल कि भांडण होतात, असेच एक प्रकरण समोर आलं आहे. भांडणाच्या रागातून प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे . मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा लातूरपर्यंत पाठलाग करून १२ तासांत चिमुरड्याची सुटका केली.

हेही वाचा :- सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री ; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला

सुनील सोपान पांढरे (२६ रा. पांढरेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिला आणि सुनील यांची बारामतीमध्ये कंपनीत काम करीत असताना ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

फिर्यादी महिलेला पतीपासून दीड वर्षाचा मुलगा असून दोघे सोबत राहत नाही. काही दिवसांपूर्वी सुनीलने प्रेयसीला तिच्या मुलासह बारामतीहून पुण्यामध्ये फिरण्यास आणले होते. ते बालाजीनगरमधील लॉजमध्ये राहून पुण्यात ठिकठिकाणी फिरत होते.

दोन दिवसांपूर्वी (३ मे) दोघांमध्ये किरकोळ कारणामुळे वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे सुनीलने प्रेयसीला मारहाण करून लॉजच्या खोलीत कोंडून ठेवत मुलाचे अपहरण केले. प्रेयसीने आरडाओरड केल्यानंतर लॉज व्यवस्थापकाने तिची सुटका केली.

हे ही वाचा (Read This) सरकारी नोकरी: महाराष्ट्र विद्युत विभागात भरती, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *