तामिळनाडूमध्ये मंदिराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून ११ जणांचा मृत्यू
तामिळनाडूमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे मंदिरात मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तंजावर जिल्ह्यातील असून रथ मिरवणुकीत ही घटना घडली आहे.
विद्युत तार एका कारच्या संपर्कात आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बघता बघता अनेक जण करंटमध्ये अडकले, त्यानंतर आता ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
https://twitter.com/ANI/
मृतांमध्ये २ मुलांचाही समावेश आहे
मंदिरात ९४ व्या उच्च गुरुपूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्यांवर पारंपारिक रथयात्रेदरम्यान विजेची तार एका कारच्या संपर्कात आली, त्यानंतर विजेचा धक्का लागून ११ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.
https://twitter.com/ANI/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मदत
तंजावर, तामिळनाडू येथे प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येणार आहे, तसेच या घटनेत जखमींना ५०,०० रुपये दिले जाणार असक्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितले.
https://twitter.com/ANI/