औरंगाबाद शहरात मोठी कारवाई ; किराणा दुकानातून हवाला रॅकेटचे १ कोटी ९ लाख पकडले

[lock][/lock]चेलीपुरा भागातील सुरेश राईस दुकानात हवाला रॅकेटच्या माध्यमातून आलेले १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात पकडले.

शहरातील सर्व हवल्याचे व्यवहार दुकानात होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

या चेलीपुरा भागातील आशिष साहुजी यांचे सुरेश राईस नावाचे दुकान आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास या दुकानातून हवाला रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. तसेच हवालाचे मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचेही समजले. त्यावरून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पथकाने छापा मारला. त्यापूर्वी पथकाने दिवसभर दुकानाची रेकी केली.

पोलिसांनी केलेल्या रेकी मध्ये अनेक जण दुकानांमध्ये जाऊन कोणताही किराणा खरीदी न करताच बाहेर आल्याचे दिसून आले. त्यामुळे हवालाचा पैसा आल्याच्या माहितीवर शिक्‍कामोर्तब झाल्यावर पोलिसांनी छापा मारला. त्या दुकानातील ड्रॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आली.

दुकानाचे मालक आशिष साहूजी यांना विचारपूस केल्यानंतर पैशाच्या बद्दल सांगता आला नाही. हवाल्याचे पैसे असल्याची स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शाखेने निरीक्षक अविनाश आघाव यांनी आयकर तसेच जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले, तोपर्यंत पैशाची मोजणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत १ कोटी ९ लाख पन्नास हजार रुपये मोजण्यात आले. त्याशिवायही मोठ्या प्रमाणात रकमेचे वाटप करण्यात आल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांना आहे.

त्यानंतर त्यांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त विषाल घुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कल्याण शेळके ,सहाय्यक फौजदार रमाकांत पठारे, विजय निकम, संदीप सानप, राजेंद्र साळुंखे ,दत्तात्रय गडेकर, वीरेन बने नितीन देशमुख, चालक शिनगारे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *