ईडीच्या कार्यालयात मनुष्यबळ पडतंय कमी , लवकरच नोकर भरती

ईडीचे संचालक संजय मिश्रा यांना आणखी एक मुदतवाढ मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते यावर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार असून, त्यांनी येथे चार वर्षे सेवा केली आहे. सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असले तरी ते प्रलंबित आहे. याचवळी वाढलेल्या प्रचंड कामामुळे ईडीमध्ये दोन डझनहून अधिक उच्चस्तरीय पदे लवकरच भरली जाणार आहेत.

दरम्यान, सरकारने कायद्यात सुधारणा करून ईडी आणि सीबीआय प्रमुखांच्या संचालकांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवला. सुधारित कायद्यानुसार मिश्रा यांचा कार्यकाळ आणखी एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो, असे वृत्त आहे. सीबीआय आणि ईडीच्या संचालकांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी वाढवण्यासाठी सरकारने केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) कायदा आणि दिल्ली विशेष पोलीस आस्थापना (डीएसपीई) कायद्यात सुधारणा केली होती.

संजय मिश्रा यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राजकारणी आणि व्यावसायिक घराण्यांचा समावेश असलेली मोठ्या प्रमाणात हाय प्रोफाइल प्रकरणे समोर आली. त्यात

येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर. आयसीआयसीआय बँकेचे माजी एमडी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर, ऑगस्टा वेस्टलैंड घोटाळ्यातील ब्रिटिश मध्यस्थ क्रिश्चियन मिशेल जेम्सची अटक, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा
समावेश आहे.

कोणती पदे भरणार ईडी??
वित्त मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक हाऊसिंगमधून आलेले अहवाल सूचित करतात की, ईडीला त्याच्या प्रचंड कामाच्या भारामुळे आणखी मजबूत करण्यात येणार आहे. ईडीमध्ये दोन डझनहून अधिक उच्चस्तरीय पदे लवकरच भरली जाणार आहेत. आठ नवे सहसंचालक, चार अतिरिक्त संचालक आणि तीन विशेष संचालक यांची भरती होणार आहे. ईडीला मोठ्या मनुष्यबळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, कारण ते देशभरात जवळजवळ दररोज छापे टाकले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *