विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आज काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष आज मुंबईत बघायला मिळण्याची शक्यता आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.

काँग्रेसच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्ते देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर जमले होते. यामुळे नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

यापूर्वी झालेल्या नागपूर, पुणे, औरंगाबाद या शहरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे बघायला मिळाले. आज मुंबई विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या सागर बंगल्यासमोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *