ब्रेकिंग न्यूज : कर्ज महागणार ? RBI गव्हर्नर शक्तीकांत दास दुपारी 2 वाजता निवेदन जारी करणार

 

आज RBI गव्हर्नर शक्तीकांत दास दुपारी 2 वाजता निवेदन जारी करतील. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर व्याजदरांबाबत काही मोठी घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे.

आरबीआयचे गव्हर्नर रेपो रेट वाढवतील अशीही अटकळ बांधली जात आहे. खरे तर महागडे खाद्यपदार्थ आणि महागड्या वस्तू आणि इंधनामुळे मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६.९५ टक्के राहिला आहे. जी आरबीआयच्या सहा टक्के सहनशीलतेच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

एप्रिलमध्ये कर्ज धोरण जाहीर करताना, आरबीआय गव्हर्नरने स्वत: सांगितले होते की, केंद्रीय बँकेचे प्राधान्य आता महागाई रोखणे असेल. आरबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून आरबीआयचे गव्हर्नर दुपारी २ वाजता निवेदन देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *