महाराष्ट्र

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे इंदापूरातील ठिकाण बदलले, ‘हे’ असेल नवीन ठिकाण

Share Now

सध्या राज्यात आषाडी एकादशीची ओढ वारकर्यांना लागली आहे, वारकरी उत्साहात दिसत असून तब्बल दोन वर्षाने वारी पुन्हा सुरु होत आहे. विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्यासाठी वारकरी या वर्ष वेगळ्याच उत्साहात आहेत. तसचे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी येत्या २० जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनरोजी देहूमधून प्रस्थान ठेवणार आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्याचे उप्पर जिल्हाधीकारी विजयसिंह देशमुख यांनी शहरातील पालखी स्थळ व रिंगण सोहळा मैदानाची पाहणी केली. यावेळी तुकाराम महाराज पालखीचा पूर्वी पालखी मुक्काम हा नारायणदास हायस्कूल, इंदापूर येथे होता. परंतू या वर्षी आय. टी. आय. कॉलेज येथे होणार आहे. अद्यापही स्थळाबाबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र पालखी स्थळ या वर्षी आयटीआय या ठिकाणीच असल्याचे स्पष्ट संकेत पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिले आहेत.

दरम्यान, पालखी मार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. लवकरात लवकर रास्ता पालखी साठी मोकळा करू असे आश्वासन देखील अप्पर विजयसिंह देशमुख यांनी दिले तसेच, पिण्याच्या पाण्याचे व्यापस्थापन देखील करण्याचे काम सुरु आहे, जेणे करून वारकर्यांना पाण्याची गैरसोय भासणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *