लग्नाला ७ वर्ष होऊनही मूल होत नाही म्हणून सासूने चक्क दिराशी ठेवायला लावले संबंध

लग्नाला सात वर्ष झाली तरी मूल होत नाही, म्ह्णून सुनेला चुलत दिरासोबत सबंध ठेव, असे म्हणत सुनेला दिर आणि मामाच्या ताब्यात देऊन तिच्यावर अत्याचार करायला लावण्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली. आपल्याच सूनेला चुलत दिराच्या आणि मामाच्या ताब्यात दिल्याचा आरोप पीडित सूनेनं केलंय. मामा आणि दिराने सूनेवर बलात्कार करून. त्यानंतर सुनेला घरातच कैद करुन ठेवले.

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित सून जेव्हा तिच्या भावासह माहेरी आली, तेव्हा तिनं आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीवरून सासू, दोन मेव्हणे, पती यांच्यासह दोघा भावजयींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस सध्या या संपूर्ण घटनेप्रकरणी तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यामधील या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 

पीडित सूनेचं लग्न 8 मार्च 2014 रोजी झालं. बांदा जिल्ह्यातील कोतवालीमध्ये हे लग्न संपन्न झालं. लग्नाला सात वर्ष झाल्यानंतरही मूल होत नसल्यानं सासरचे सूनला त्रास द्यायला लागले. अखेरीस 17 नोव्हेंबर 2021 रोजी सासूने वंश चालवण्यासाठी सूनेला घृणास्पद कृत्य करण्यास भाग पाडलं. “चुलत दिरासह मला एका खोलीत सासूने बंद केलं आणि त्याच्यासोबत मूल व्हावं यासाठी लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली”, असा आरोप करण्यात आला आहे. सलग काही दिवस हाच प्रकार सुरु असल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय.

ही बाब पतीला सांगितल्यानंतर त्यानेही या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. आई सांगतेय तसं कर, असं म्हणत पत्नीच्या आरोपांकडे पतीने लक्ष दिले नाही. दरम्यान, काही कारणास्तव पीडित माहिति अली असता तिने भावाला हा सर्व प्रकार सांगितला. नंतर भावाने पीडितेला घेऊन पोलिसात धाव घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *