राणा दाम्पत्यानां दिलासा ; तब्बल १२ दिवसानंतर जामीन मंजूर
राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयात आज दिलासा मिळाला आहे . राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा मिळाला असून,मागील सुनावणीत राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवार ४ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती . आज राणा दाम्पत्यानं न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे, तब्बल १२ दिवसानंतर त्यांची कोठडीतून सुटका होणार आहे.
शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्या नंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. तसेच आमदार रवी राणा यांच्याविरोधात १७, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ६ गुन्हे दाखल आहे . त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता .
हेही वाचा :- खा. नवनीत राणा याना जामीन मिळाला पण ; प्रकृती खालावली, जेजे रुग्णालयात दाखल
जामीन याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारनं राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल असल्यानं त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामीनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असं म्हटलं आहे. तसेच, खासदार नवनीत राणा यांचा विशेष उल्लेखही राज्य सरकारकडून या उत्तरात करण्यात आला आहे.
हेही वाचा :- राज ठाकरेनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट ; करत केली मुख्यमंत्र्यांवर टीका
खा. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मुलुंड पोलीस स्थानकातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दाम्पत्याला जामीन देऊ नये, असं म्हणत राज्य सरकारनं उत्तर दिले आहे.
हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे