राज ठाकरेनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ ट्विट ; करत केली मुख्यमंत्र्यांवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात राज्यतील काही शहरात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. काही ठिकाणी पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आली आहे .

मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे लावले जात असताना राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत एका सभेत आक्रमक भूमिका मांडली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला असल्याची चर्चा आहे. काल राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण करण्याबाबत आवाहन करणारे पत्र मनसे कार्यकर्त्यांना दिले होते .

हेही वाचा :- मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा राग ; जन्मदात्या माय बापाने केला मुलीचा खून

यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार की शरद पवार यांचे ऐकणार असा सवाल उपस्थित केला.

यात “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी “सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात ? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.” त्यानंतर आज राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे.

हे ही वाचा (Read This) Summer Special : घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *