देशमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील चार खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर तर सुप्रिया सुळे सातव्यांदा संसद रत्न

Share Now

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. चेन्नईच्या प्राइम टाइम फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या अकरा खासदारांचा यात समावेश आहे महाराष्ट्राच्या चार खासदारांना या संसदरत्न पुरस्कार मिळाला यात शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हिना गावित यांना देखील संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे.

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न हा पुरस्कार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे भाजपच्या हिना गावित आणि राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांना देण्यात येत असल्याचे फाउंडेशनच्या वतीने आज जाहीर करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे 11 जणांना मिळणारा हा पुरस्कार याच महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे .

रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन के प्रेमचंद्रण तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय काँग्रेसचे खासदार कुलदीप शर्मा आणि भाजपचे खासदार विद्युत महातो, सुधीर गुप्ता तसेच राज्यसभेतील बिजू जनता दलाचे अमर पटनायक कम्युनिस्ट पार्टीचे खासदार के के रागेश यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *