कौंटुंबिक वादातून विवाहितेची हत्या ; चक्क तिसऱ्या मजल्यावरून फेकलं

बीड शहरातील शाहूनगर परिसरात ही धक्कादायक घटना समोर आलीय. येथील एका विवाहित तरुणीला तिच्या सासरकडील मंडळींनी तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकल. घरातील होणाऱ्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात पतीसह दीर, जाऊ विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

यास्मिन शकूर शेख २१ वर्षीय विवाहित तरुणीचे नाव या प्रकरणी तिच्या वडीलानी इस्लामपुरा बीड पोलिसांत तक्रार दिली. यास्मिनच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी संबंधित आरोपी पती शकुर बशीर शेख याला अटक केली.

हे हि वाचा :- लॉजमध्ये डॉक्टर महिलेची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २९ वर्षीय आरोपी शकूर शेख याच पाच महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील इस्लामपूर येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय यास्मिन सोबत विवाह झाला होता. आरोपी शहापूर हा मिस्त्री काम करतो लग्नानंतर काही दिवस त्यांनी यास्मिनला चांगले सांभाळले पण त्यानंतर सासरच्यांनी छळ करायला सुरुवात केली. सतत होणाऱ्या छळाला यास्मिन कंटाळली होती.

हे हि वाचा :-  पुणे हादरले ; ११ वर्षीय चिमुकलीवर शाळेत बलात्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *