तुमचा EMI पुन्हा वाढणार, आरबीआयने केले नवीन नियम

तुमचा EMI महाग होणार आहे. RBI ने सलग दुसऱ्या महिन्यात रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेट 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे तर रेपो दरात 50 बेस पॉईंटची वाढ केली आहे. RBI च्या पतधोरण बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही घोषणा केली आहे. म्हणजेच आता एका महिन्यात रेपो दरात 90 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर गृहकर्जापासून ते कार कर्ज आणि शैक्षणिक कर्ज महागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे, त्यांचा ईएमआय अधिक महाग होईल.

हेही वाचा :

RBI गव्हर्नरांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. RBI गव्हर्नर म्हणाले की, महागाई सातत्याने वाढत आहे. युद्धामुळे पुरवठा अडचणीत आल्याने महागाई वाढली आहे. कोविड महामारीनंतर आरबीआय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले उचलत राहील. त्यांनी म्हटले आहे की जागतिक आर्थिक क्रियाकलाप आणि गती मंदावली आहे आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. देशात महागाईचा ताण वाढत आहे. शेतमाल बाजारातही घट झाली आहे. चलनविषयक धोरणाच्या नियम पुस्तकानुसार काम होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *