महाविकास आघाडी सरकार पडणार का? कॉग्रेस राष्ट्रवादी आम्हाला नको, शिवसेनेच्या १९ नाराज उमेदवारांची भूमिका

आता राज्यातीत राजकीय वादंग जोर धरत आहे, काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचे सरकार आम्हाला नको असे नाराज आमदारांनी आपली भूमिका मांडली आहे, अशी माहिती आला समोर येत आहे. अडीच वर्ष घरोबा केला आता आम्हाला हे सरकार नको. तसेच आम्ही शिवसेने सोबत आहोत मात्र आता आम्ही कॉग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा करणार नाही. अशी भूमिका नाराज आमदारांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एकनाथ शिंदे दगा करणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला पोहचले आहेत . एकनाथ शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात देखील आहेत . विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे २५ शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.

बाजारात आणलेले शेतमाल भिजले, शेवटी जबाबदार कोण?

दरम्यान यावर खासदार संजय राऊत त्यांनी वक्तव्य केले आहे, एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसेनीक आहे. ते महाविकस आघाडीला दगा फटका करणार नाही असे ते म्हणाले,दरम्यान, साताऱ्याचे आमदार महेश शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, पंराड्याचे आमदार तानाजी सावंत, बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर, मेहकरचे आमदार संजय गायकवाड, बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांचा मोबाईल बंद आहे, सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर, महाडचे भरत गोगावले हे आमदार त्यांच्या सोबत आहे अशी माहिती समोर येत आहे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *